एक फेरी सूर्य मालिकेच्या बाहेर!!!!!
१ जानेवारी, २०६६ ;आज आम्ही आमच्या लक्ष्या जवळ पोहचलो . बरीच वर्ष झोपलेल्या कक्षात म्हणजेच स्लीपिंग चेंबर मध्ये घालवून सगळं जणू विसरलो आहोत. तरीही मन आनंदाने उखळून आले आहे. आज आम्ही सूर्य मालिकेच्या बाहेर जाणारे व इंटरस्टेलर मध्ये प्रवेश करणारे पहिले मनुष्य ठरू. काहीच वेळात आम्ही सूर्याकडून १८.११ कोट्यावधी किलोमीटरची दूरी तय करून आमचं लक्ष पूर्ण करणार आहोत. मनात बरेचसे प्रश्न घर करून बसले आहेत. इथे अजून कोण असेल का ?, तेथील दृश्य कसे असेल?, आमच्या इच्छा पूर्ण होतील का ?, हा मोठा प्रवास आम्हाला कोण कोणत्या आठवणी देईल? या सर्व प्रश्नांनी चित्त थारावत नव्हतं. डोळे मात्र ते अविश्वासनीय दृश्य बघण्यास आतुर होते.
मिस्टरी यानाच्या खिडकीकडे उभी असतानाच ग्राउंड सिस्टम कडून संकेत मिळाला,"आता तुम्ही इंटरस्टेलर मध्ये प्रवेश केला आहे". आम्ही आमचे लक्ष यानाला सांभाळण्यात केंद्रित केले. इलेक्ट्रॉनमुळे कंप तयार झाला व त्यामुळे आमचे यान ही आपली दिशा सोडत होते. समोर फक्त रंगीबेरंगी धुके दिसत होते. हे धुके आपल्या सूर्यासारख्याच दुसर्या तार्यांच्या वार्यामुळे तयार झाले होते. इथे मध्ये मध्ये काही स्फोट होताना दिसत होते. हे स्फोट खूप लांब होत होते. विभिन्न अंश, व ऊर्जाने मिळून इथले चुंबकीय क्षेत्र प्रचंड मोठे बनवले होते. बरेचसे लघुग्रह इथून तिथे नाचत होते. आम्ही सर्व या दृश्यांचा आनंद घेत फोटोग्राफी करू लागलो आणि हे फोटो ग्राउंड सिस्टमला पोहचताच त्यांनी ते प्रकाशित केले. पूरी धरती आम्हाला शुभेच्छा देत होती. मानव जातीच्या समारंभात ही एक गुणवत्ता झाली जणू.
सर्व कार्य पूर्ण केले, त्याच सोबत यानाला स्वयंचलित मोड वर केले. आता आम्ही आमच्या संपूर्ण प्रवासाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहणार होतो. पहिले म्हणजे आमचं प्रक्षेपण म्हणजेच धरती सोडणं. सगळ्या मीडिया आमच्या प्रक्षेपण लाइव दाखवत होत्या. खूप सारा जोश सोबत घेऊन आम्ही चौघ व आमचे यान, सर्व १ जानेवारी २०३० ला मिशनसाठी निघालो. आमचे स्पॉट पॉईंट म्हणजेच यात्रेतले मैलाचा दगड जणू. हे स्पॉट पॉईंट मंगळ ग्रह, जुपिटर ग्रह, टायटन जो शनी म्हणजेच सैटनचा चंद्र आहे, आणि इरिस इथे होते. त्यांच्या जवळून गेल्यावर आमचे स्लीपिंग चैम्बर आम्हाला जागं करायचे. स्लीपिंग चैम्बर ही अशी वस्तू आहे जी आम्हाला गाढ झोपेत ठेवायची व आमचे वय वाढवणे थांबवायची. जाग आल्यावर यान तपासणे व ग्राउंड सिस्टमला रिपोर्ट, नवीन रिसर्च, प्रयोग व शोध ही कार्य आम्ही निभावली. सर्व काम व तपास झाल्यानंतर आम्ही अवघ्या एका दिवसात पुन्हा स्लीपिंग चैम्बर मध्ये जायचो. पुन्हा एक गाढ झोप.
रेकॉर्डिंग मध्ये आम्ही झोपेत असताना ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या सर्व होत्या. त्याच सोबत आमच्या परिवाराचे व्हिडियो ही होते. मुले मोठी झाली होती. वृद्धांनी निरोप घेतला होता. ६ जीचे नेटवर्क १३ जीवर पोचलेले. आता प्रत्येकाकडे स्वतःचे स्पेस क्राफ्ट होते, ज्याने ते आपल्या मंगळावरील नातेवाईकांना भेटायला जात. काही श्रीमंत लोकांनी तर स्वतःचे स्पेस स्टेशन बांधले होते. धरती खूप प्रमाणात खाली झाली होती. ती परत स्वतःला हिरव्या दागिन्यांनी सजवत होती. आता तर घरात नव्हे तर घरच रोबोटिक झाले होते. बस एक कमांड आणि सर्व गोष्टी हातात. क्लाउड पार्क, डीप सी पार्क, स्पेस पार्क, मून पार्क, या सर्व गोष्टी लोकांना आकर्षित करत होत्या. हातातला मोबाईल आता जुनी फॅशन होती, आता 3D मोबाईल स्क्रीनचा जमाना आला, बस हवेत हात फिरवा आणि मोबाईल स्क्रीन तुमच्या समोर… लोकांचे जीवन बदलले होते आणि बदलले होते त्यांचे विचार. मानव, प्राणी, झाडं सर्वांचे क्लोन म्हणजेच हुबेहुब झेरॉक्स कॉपी बनवण्यास परवानगी मिळाली होती. ह्या मुळे लोकांना खूप सारी काम करता येत. हे सगळे पाहुन मन भरून आले. आता आम्ही गेल्यावर अजून काय बदल होतील कोण जाणे.
याच विचारात हातात कॉफीचा मग घेऊन मिस्टरीच्या खिडकीकडे गेले. बाहेर बस रंग आणि रंग.. हातात रंग घेऊन ते दृश्य कागदावर उतरून काढावे अशी इच्छा झालेली. लवकरच मानव दुसर्या दीर्घिका मध्ये ही प्रवेश करेल. आता वेळ होती अंतराळात चालण्याची म्हणजेच स्पेस वॉकची. आम्ही बाहेर गेलो. जसा विचार केलेला त्याहूनही सुंदर दृश्य होते. आम्हाला एक रेखा दिसत होती;ही रेखा सूर्याच्या हवेचे आवरण होते. जिथे हे आवरण संपले तिथून इंटरस्टेलर चालू होते. असेही म्हटले जाते की इंटरस्टेलर गरम आणि थंड दोन्ही असते, कारण तेथील कण खूप वेगाने पळतात परंतु तिथली जागा प्रचंड असल्या मुळे ते आपली ऊर्जा कोणा दुसर्याला देऊ शकत नाहीत. पाहता पाहता नजर एका सोन्याच्या तुकड्यावर गेली. तो तुकडा वोएजर १ चा होता. त्याला कोण कसं विसरेल? मनुष्याने बनवलेला तो पहिला तांत्रिक उपग्रह होता ज्याने इंटरस्टेलर मध्ये २५ ऑगस्ट, २०१२ म्हणजेच सुमारे ५४ वर्ष पूर्वी प्रवेश केलेला. त्याचे तुकडे पाहून खूप वाईट वाटले त्याच सोबत मनुष्यावर गर्वही झाला. हा सोन्याचा तुकडा त्याच्या वरील असलेल्या एका प्लेटचा होता, ज्यावर आवाज व चित्र काढलेली होती जी धरतीवरील जीवन दाखवत होती.
कळत नकळत १ तास उलटून गेला. आता वेळ परत घरी म्हणजेच आमच्या लाडक्या धरतीकडे जाण्याची होती, परत त्या स्लीपिंग चैम्बर मध्ये गाढ झोपेत जाण्याची होती. ह्या चैम्बर मध्ये १००% पर्यंत ऑक्सिजन भरलेले असायचे. त्यामुळे आमचे वय वाढण्याची शक्यता कमी होती. अशा प्रकारे, आम्ही आमच्या परतीचा प्रवास करणार होतो. पुन्हा ती झोप, स्पॉट पॉईंट जवळ जाग आणि मग… घरी!!!! किती सुंदर आणि अविश्वासनीय प्रवास होता हा!!! प्रवासाच्या निमित्ताने आम्ही आमच्या नावावर एक इतिहास लिहिला होता. परत एकदा तो सुंदर नज़ारा पाहण्यास खिडकी कडे गेले. जीवनाचे काहीच क्षण राहिले जणू. धन्यवाद त्या चित्रकाराला ज्यानी हे इतके सुंदर रंगवले.
बस आता एक शेवटची ओळ, मी हा प्रवास कधीच विसरणार नाही… भेटू पुन्हा…
अप्रतिम!! लक्ष वेधून ठेवणार लिखाण आहे लेखिकेचे!