हिंदू धर्मामध्ये वेदांना जीवनाचा आधार मानला जातो, सृष्टीच्या आरंभापासून ते अंतापर्यंतच्या सर्व गोष्टींचा त्यात समावेश केलेला आहे.अनेक प्रकारचे औषधी वनस्पती,जडी-बुटी आणि मंत्रांचा वापर करून अनेक रोगांवर मात केली जाते.
प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेद हा संस्कृत भाषेतील शब्द आहे. आयुर्वेदाची सुरुवात ब्रह्मदेवापासून झाली असे मानले जाते. आयुर्वेद ही 3000 वर्षा पासून चालत आलेली व्यापक परंपरा आहे. त्यात उपचार पद्धती, वनौषधी, आहाराविषय नियम , व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी उपाय सांगितले आहेत. आयुर्वेद हा आयुष्याचा वेद आहे. रोगांपासून मुक्त होण्यासाठी आणि आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी ज्या ज्या द्रव्याचा उपयोग होतो, ती ती सर्व द्रव्य आयुर्वेदीक औषधांमध्ये समाविष्ट आहेत. गोड, आंबट, खारट , तिखट, कडु , तुरट चवीच्या अन्नाचा आणि द्रव्याचा दोष ,धातू आणि मळ यांवर कसा परिणाम होतो याचे वर्णन केले आहे.
पण आता कलयुगात सामान्य लोकांना आयुर्वेदाचा विसर पडला आहे. आयुर्वेदाच्या गुणांचे ज्ञान नाही किंवा ते घेण्याची ओढही नाही. असं का? माणुस परंपरा विसरत चालला आहे, माणसातल्या माणुसकीलाच विसरत चालला आहे, ते फक्त पैसा कमवायच्या नादात. जेव्हा केव्हा देविदेवतांचा उल्लेख केला जातो आयुर्वेदाचा उल्लेख केला जातो तेव्हा थट्टा उडवली जाते. नेमका हा ब्रह्मदेव कोण? त्याचं अस्तित्व काय ? केवळ नामांतर गोष्टींसाठी त्याचा वापर केला जातो. माणूस स्वार्थी झाला आहे. तो केवळ स्वतःचाच विचार करतो, सोशल मिडियाच्या भ्रमात आपली संस्कृती विसरत चाललाज् आहे. जगत्पिता ब्रह्मदेवाला बाह्य नजरेत बघतो. अनेक प्रश्न पडतात की रामायणामध्ये आयुर्वेदाचा काय संबंध? पण संबंध आहे, रामायणात श्री हनुमान यांनी श्रीराम यांचे भाऊ लक्ष्मणाचा जीव वाचवण्यासाठी संपूर्ण द्रोणागिरि पर्वत उचलून आणला ते केवळ संजीवनी बुटी साठी. ती एक औषधी वनस्पती आहे , जिने लक्ष्मणाचे प्राण वाचवले .
सध्या आपल्या स्वयंपाक घरात असलेले अनेक गुणाकारक पदार्थ आहेत पण नेमके आपल्याला ते माहीत नाहीत. उदाहरणार्थ कापुर, आपल्या धर्मग्रंथामध्ये कापुर अत्यंत शुद्ध मानले जाते. आत्ता बाजारात विकत मिळणारे कापुर रसायने टाकुन तयार करतात पण नैसर्गिक कापुर वनस्पती पासुन तयार केले जाते. कापुरयुक्त धुर लावल्याने हवेतील विषाणू नष्ट होतात आणि घरात शांत व प्रसन्न वातावरण निर्माण होते.तसेच रोज जेवणात कांद्याचे सेवन केल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढते. कोमट पाणी पिल्याने सर्दी होत नाही, कुत्रीच्या झाडाचे मुळं चघळल्याने दात मजबूत होतात, हळदीने त्वचा मऊ राहाते, तसेच हळदीचे लेप जखमेवर लावल्याने जखम बरी होते. त्याच प्रमाणे तुळशी , विळा, गुरुवेल, गुळ, कलमी, अद्रक, निरगुळी इत्यादींचे अत्यंत लाभकारक उपयोग आहे. मनाला शोकांतिका वाटते की आपल्याला आयुर्वेदाचा ज्ञान नाही.
आता जगभरात कोरोना माहामारी पसरली आहे. पुणे-मुंबई सारख्या ठिकाणी रोजच्या रोज मृत्यू दर वाढत आहे. कित्येक महिने लोटले पण अजूनही या रोगावर औषध नाही. सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता लोक आपल्या स्वाथ्याची काळजी घेऊ लागले. लऑकडाऊनमध्ये घरगुती उपचार करायचं ठरवलं पण आयुर्वेदाचे ज्ञान नव्हते म्हणजे डोळे असुन आंधळा झाल्यासारखा झालं. ते म्हणतात न जुनं ते सोनं ते खरं ठरलं ज्या आयुर्वेदावर आधी संपूर्ण वैद्यकीय प्रक्रिया अवलंबून होत्या , ज्या आयुर्वेदाला माणुस विसरला होता आता त्याची गरज भासू लागली. शेवटी माणुस च माणसाच्या कामी आला तो ज्ञानाचा अभाव यु ट्यूब, गूगल या सारख्या सोशल मिडीयानी पूर्ण केला. आयुर्वेद हा भारतीय प्राचीन इतिहासाचा अविभाज्य घटक आहे. त्याचा जन्म भारतात झाला. आपल्याला एक भारतीय म्हणून या गोष्टीचा अभिमान असला पाहिजे .
"अनादी अनंत आयुर्वेद स्वतंत्र" ज्ञान कधीच वाया जात नाही त्यामुळे जेवढं मिळेल तेवढं घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
👌✌️