top of page

कोरोना काळ आणि आधुनिक रसायनशास्त्र

Riteshkumar Patil

असेल विज्ञानाची साथ! तर होईल प्रत्येक रोगाचा नाश!

विचार करा,जर रसायनशास्त्र नसते तर डिएनए(DNA) आणि आरएनए(RNA) हे कुणाला ठाऊक झाले असते का? तर नाही! पण हा प्रश्न का? कारण कोरोनाच्या उगमापासून ते लस येईपर्यंतचा पूर्ण प्रवास हा RNA वरच टिकून आहे.म्हणजेच कोविड-१९ चा शोध लागल्यापासून ते त्याचा उपचार पद्धतीपर्यंत रसायनशास्त्राने मोलाची भूमिका बजावली आहे.ती कशी आपण पाहूया!

कोरोना नेमका दिसतो कसा? याचा शोध घेण्यासाठी आपण जरा ह्या विषाणूमागचे रसायनशास्त्र जाणून घेऊया चला! कोरोनाचे रंगरूप हे जैव रेणू(biomolecules) ने बनले आहे.पण असं का? कारण कोरोनाचं सर्वात बाहेरील कवच म्हणजेच जणू क्रिकेटच्या चेंडू वरील पकड(ग्रीप), ती म्हणजे लिपिडचे (स्निग्ध पदार्थ) दोन आवरण आणि त्यांना मेंब्रेन ग्लायकोप्रोटीन जोडून ठेवतो.जसे काटेरी झुडूपांना काटे असतात तसे प्रथिनांचे(Proteins) काटे त्यावर असतात आणि त्याचा सर्वात आतील भागात सापासारखी विंटलेली आरएनएची मोठी साखळी असते आणि खरं कार्यक्षम तर ही आरएनए साखळीच असते.


अहो!पण कोरोना आला कसा? याचा शोध घेण्यासाठी रसायनशास्त्राचाच वापर केला तो कसा ते आपण पाहूया,तर शास्त्रज्ञ म्हणतात की वटवाघूळाचं मांस खाल्ल्याने माणसाच्या लाळेमध्ये काही विषाणूचं जनुकीय परिवर्तन (म्युटेशन) झालं आणि मग तो एका माणसापासून दुसऱ्या माणसापर्यंत सहज पसरत गेला आणि आज संपूर्ण जगात थैमान घातलं आहे.पण ते कसं? तर आपल्याला रसायनशास्त्रामुळे कळाले की वटवाघूळाच्या लाळेतील विषाणूचा आरएनए आणि मानवाच्या शरिरातील विषाणूचा आरएनए हा वंशावळीनुसार (phylogenetically) सारखा तर आहेच पण त्यात जनुकीय(genome symmetry) साम्य सुद्धा आहे आणि यावरून हे ही कळाले की कोरोनाचा संसर्ग (transmission) कसा होतो! परंतु अजूनही हे कळालेलं नाही की वटवाघूळाचा आणि मानवाच्या मधील दुवा कोण आहे? शास्त्रज्ञ म्हणतात की जर ह्या मधील दुवा शोधला तर कोरोनाची विल्हेवाट लावणे सोप होईल.


आपल्याला कोरोना आहे की नाही हे माहीत करून घेण्यासाठी आरटी-पीसीआर म्हणजे रिवर्स ट्रासंक्रिप्टेस-पॉलिमरेज चेन रिऐक्शन ही चाचणी करतो, ती पण एक रासायनिक अभिक्रियाच आहे.यामध्ये आपण न्यूक्लेइक ऐसिड(विषाणूचा आरएनए) लाळेत आहे की नाही याची पडताळणी करतो.आरएनए हा घटक सर्व जीवित कोशिकांमध्ये आढळतो.

पण असो! आपण आता पाहूया कोरोनावर उपाय काय? तर याचा विचार केला तर आपल्याला माहिती आहे की सर्व वैद्यकीय औषधांचा पाया सेंद्रिय रसायनशास्त्रच (और्गॆनिक केमेस्ट्री) आहे. यातही आपण रेमेडीसविर, हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन, एज़िथ्रोमाइसिन, सिप्रोफ्लोक्सासिन आणि फेविपिराविर ह्या सारख्या औषधांचा वापर विविध पातळीवर करत आहोत. तर यांचा उगम सुद्धा कोणत्या ना कोणत्या रासायनिक अभिक्रियेतूनच झाला आहे. त्यातल्या त्यात आपण रोज घ्यायची काळजी म्हणजे जंतूनाशक (sanitizer) लावणे ,हे जंतूनाशक सुद्धा अल्कोहोल म्हणजे रसायनशास्त्राचीच देण आहे.



रेमडेसिवीर (Remdesivir)


आता कोविड-१९ ची लस बनविण्यात रसायनशास्त्राची काय भूमिका आहे? ते आपण पाहूया,सध्या ज्या लसींवर शोध सुरू आहे त्यातील बऱ्याच लसी ह्या एम-आरएनए पासून बनलेल्या लसी आहेत.ही लस प्रयोगशाळेत तयार झालेल्या विषाणूच्या लहान भागाच्या अनुवंशिक कोडची कॉपी करुन बनविली जाते ती मानवी पेशींमध्ये तयार होते.अशी आशा आहे की, या लसीच्या सहाय्याने शरीराची प्रतिकारशक्ती खरंतर विषाणूंविरूद्ध लढण्यास सक्षम होईल. दुसरा पर्याय म्हणजे प्लाझ्मा तंत्रज्ञान, त्यामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती कोरोना संक्रमित होऊन बरी झाली आहे म्हणजेच ज्यांच्या प्रतिपिंडांनी कोरोनाच्या विषाणूशी यशस्वीरित्या लढा दिलेला असतो अशा व्यक्तींकडून आपण प्लाझ्मा (रक्तातील पिवळसर रंगचा द्रव)घेऊ शकतो आणि योग्य प्रमाणात त्या व्यक्तीला देतो ज्याला कोरोना झाला आहे आणि त्याचा प्रतिपिंड ह्या कमकुवत आहेत या विषाणूशी लढा देण्यासाठी.ही एक जुनी पद्धत आहे पण यात त्रुटी अशी आहे की रक्तातील महत्त्वाचा घटक म्हणजे प्रभावी प्रतिजैविक ग्लोब्युलिनचा पुरवठा अत्यंत मर्यादित असल्यामुळे योग्य प्रतिपिंड रक्तदात्यांची संख्या मर्यादित आहे असे काही शास्त्रज्ञ म्हणतात, ही ह्या पद्धतीची कमतरता आहे. दोन्ही पर्यायांमध्ये रसायनशास्त्राची गरज तर नक्की भासलीच!

आपण पाहिले की कसं या विषाणूला जाणून घेण्यापासून ते त्यावर उपचार पद्धतीपर्यंत रसायनशास्त्राने कशी मदत केली आणि माझ्यामते तर प्रत्येक रोगाचा निराकरण करण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर रसायनशास्त्र आवश्यक आहेच!


26 views0 comments

Recent Posts

See All

Comentarios


Post: Blog2 Post
bottom of page