क्लोनिंग म्हंटल की तुमच्या डोक्यात काय येत?
इंग्रजी चित्रपटानंमुळे आपल्या डोळ्यांसमोर दोन किव्हा अधिक एक सारखे दिसणारे माणस येतात जे वैज्ञानिकांनी एका गुप्त प्रयोगशाळेत तयार केले आहेत.असे चित्रपट पाहिले कि आपल्या मनात पहिला प्रश्न येतो कि; हे खरच शक्य आहे का?एका माणसा सारखा दिसणारा दुसरा माणूस आपण एका प्रयोगशाळेत तयार करू शकतो का?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायच्या आधी आपण क्लोनिंग म्हणजे नक्की काय हे जाणून घेऊ.क्लोन म्हणजे एक असा जीव/पेशी /जीव समूह/पेशी समूह जो एकाच पूर्वजांपासून विना संभोगच्या तयार झाला आहे आणि त्यांचे व त्या पुर्वजाचे जनुके(genes) एकसारखे असतात.क्लोनिंग म्हणजे क्लोन्स तयार करायची प्रक्रिया.क्लोनिंग काय आहे हे आपल्याला कळले, आता प्रश्न येतो की हे खरंच शक्य आहे ? तर हो क्लोनिंग हे शक्य आहे.
एखाद्या प्राण्याचे क्लोनिंग नेमक कस केल जात?
वैज्ञानिक ज्या प्राण्याला क्लोन करायचं आहे त्या प्राण्याची लिंगपेशी सोडून कोणत्या पण दुसऱ्या पूर्णपणे विकसित झालेल्या पेशी घेतात,जसे त्वचा पेशी; आणि मग त्यातला डीएनए अश्या अंडी पेशी मध्ये टाकतात ज्याचा स्वतःचा डीएनए काढलेला आहे.सहसा विजेच्या प्रवाहचा वापर करून अंडी पेशी (बिना डीएनऐ)आणि त्वचा पेशी यांना एकत्रीत केले जाते.व त्यानंतर अंड्याला एका परीक्षण नळी मध्ये गर्भात विकसित होऊ दिले जाते.मग त्या गर्भाच रोपण त्याच जातीच्या प्रौढ मादेच्या गर्भाशय मध्ये केले जाते.अखेरीस ती मादा प्राण्याला जन्म देते.हा नवजात आणि त्वचा पेशी दान करण्याचे जनुके(genes) एकसारखे राहतील. ह्या नवजात प्राण्याला आपण क्लोन म्हणतो.आपण गेल्या ५० वर्षात वेग वेगळ्य प्राण्यांचे क्लोन्स तयार केले आहे जसे उंदीर,गाय ,मेंढी ,मांजर,कुत्रा,ससा ,बंदर(रेशस).
क्लोन कधी नैसर्गिकरित्या तयार होतात का?
हो,निसर्गात काही झाडे व काही एक-पेशी जीव बिना संभोग करता पुनरुत्पादन करतात,त्यांचे व त्यांच्या संततीचे जनुके(genes) एकसारखे असतात. आपण कधीतरी टिव्ही वर किंव्हा आपल्या आजू-बाजू ला एकसारखे दिसणारे जुडे पहिलेच असतील तेच म्हणजे नैसर्गिक क्लोन्स किंवा एकसारखे जुळे; माणसांमध्ये व अन्य सस्तन प्राण्यांमध्ये पहायला भेटतात. एकसारखे जुळे तयार होतात जेव्हा एका फलित अंडीचे दोन तुकडे होतात.त्या जुळयाचे जनुके(genes) जवळपास एकसारखे असतात,पण त्या दोघांचे पण जनुके(genes) त्यांच्या पालकान पासून वेगळे असतात.
माणसाच क्लोनिंग झाले आहे का?
आपण पाहिला आहे कि वैज्ञानिकांनी गेल्या ५० वर्षात वेग-वेगळ्य प्राण्यांचे क्लोंस तयार केले आहेत.मग, त्यांनी माणसाचा क्लोन तयार केला आहे का? हाच प्रश्न येतो डोक्यात.सध्या तरी माणसाच क्लोनिंग विज्ञान कल्पित कथाच आहे.पण जर तुमच्या सारखे हुशार लोकानी यावर काम केले तर नक्कीच पुढच्या १५ वर्षात माझा क्लोन हा लेख वाचत बसला असेल!!!
Comments