top of page

चंद्रावरील दुनिया

Sonal Shinde

Updated: Nov 23, 2020

गॅलिलिओ आणि काही वैज्ञानिकांचा स्वर्गात संवाद सुरू होता. त्यात एका वैज्ञानिकाने उत्साहाने गॅलिलिओ म्हणाले, ही माणसं चंद्रावर पर्यटनासाठी जाण्याची स्वप्न बघत आहे. पण गंभीर प्रश्न म्हणजे हा की लोकं नेमके चंद्रावर जाऊन करतील तरी काय? त्यावर उत्तर देताना गॅलिलिओ म्हणाला, हो ना! मी तर फक्त पृथ्वीचा चंद्र आहे एवढेच सांगितले होते.पण ही माणसे …….यात अडथळा टाकत, नुकताच मरण पावलेला वैज्ञानिक स्वर्गात उतरला आणि म्हणाला की चला मी दाखवतो पृथ्वीवरील माणसं चंद्रावर जाऊन करतील तरी काय!


"चलो दिलदार चलो चाँद के पार चलो,हम है तयार चलो" पाकीजा चित्रपटाची ही ओळ मला आता खरी झाल्या सारखी दिसतेय.पहिले यान १९५९ साली 'सोव्हिएत युनियन' ने चंद्रावर पाठवले होते. नील आर्मस्ट्रॉंग यांनी २० जुलै १९६९ मध्ये अपोलो -११ मिशनद्वारे चंद्रावर पहिले पाऊल यशस्वीपणे टाकले. हवा व वातावरण नसल्यामुळे आजही त्यांच्या पायाचे निशान तिथे सापडतात.त्यानंतर १९७२ पर्यंत सहा वेळा यान चंद्रावर उतरले.म्हणायला गेले तर चंद्राचा व्यास फक्त ३४७४ किलोमीटर असल्याकारणाने पृथ्वीच्या लोकांना तेथे तो एखाद्या भुतळ्या(महासागर) सारखाच वाटेल. पृथ्वीचा व्यास याची तुलना चंद्राच्या व्यासाशी करतो म्हटलं तर चार चंद्र एका पृथ्वीमध्ये बसतील.


गंमत म्हणजे अशी, की पृथ्वीचे कॅलेंडर चंद्रावर अमावस्या व पौर्णिमा च्या बाबतीत उलटेच चालणार. म्हणजे पृथ्वीवरील अमावस्याच्या दिवशी चंद्रावरून पौर्णिमा दिसणार आणि पौर्णिमेच्या दिवशी अमावस्या दिसणार. पृथ्वीवर चंद्रग्रहण असेल त्यावेळेस चंद्रावर सूर्यग्रहण असणार, पण ज्यावेळेस पृथ्वीवर सूर्यग्रहण असेल त्यावेळेस चंद्रावर पृथ्वीग्रहण असेल.म्हणजे चंद्रग्रहण नावाची गोष्टच नसेल! पतीच्या पतिव्रता पत्नीला एक मोठा झटका लागेल कारण करवाचौथ साठी चंद्र कुठून आणणार?


चंद्रमा ची जमीन उबड-खाबड असल्याने लोकांना वेगळाच अनुभव येणार.लोकांना तिथे चालायला नाही फक्त टुबुक-टुबुक उडायला कमी गुरुत्वाकर्षण मस्त कामात येणार.म्हणजे विमानाचा अनुभव सर्वसामान्य माणूसही घेणार आणि छोट्या-छोट्या यानात आम्ही बसून शाळेतही जाणार.चंद्रावरच्या शाळेत खडू आणि फळा नसणार आणि पी.टी. च्या तासाला आपण एक उडी मारताच तरंगत राहणार. सगळ्यात जास्त कुणाला आवडणार चंद्रावर जायला, ते म्हणजे त्या व्यक्तीला ज्यांना लठ्ठ अशा नावाने संबोधले जातात.कारण तिथे गेल्यानंतर त्यांचे वजन सहा पटीने कमी होऊन जाणार. मग बारीक लोकं तर हवेतच उडणार !


चंद्रावरील एक वर्ष व चंद्रावरील एक दिवसाचा कालावधी हा एकच असतो. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी जसे ३६५ पृथ्वीवर चे दिवस लागतात. तसेच चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी पृथ्वीच्या तुलनेत २७ पृथ्वीवरचे दिवस लागतात. तसच चंद्राची एकच बाजू ही पृथ्वीवरून आपल्याला दिसत असल्यामुळे चंद्राचे एक वर्ष हे २७ पृथ्वीच्या दिवसांबरोबर असते ज्याला इंग्रजीमध्ये "टायडल लॉकिंग" असे म्हणतात. म्हणजेच आपण चंद्रावरील एका दिवसात चंद्रावरील एका वर्षाचे होऊन जाणार.


चंद्रमा फक्त १.५५ अंश तिरकी असल्याकारणाने आपण तिथे ऋतूंचा अनुभव नाही घेऊ शकणार.पण हे पक्के, तुम्हाला दिवसात 'उन्हाळा' आणि रात्रीला 'हिवाळा' अनुभवायला मिळणार. मी असे यासाठी बोलतो कारण चंद्रावर दिवसाचे तापमान पाणी उकळेल इतके असते आणि रात्रीला कडाक्याची थंडी पडते.


माणसं तर तिथे एका बाबतीत फारच आनंदी आहे.कारण अमेरिकन अंतरिक्ष एजन्सी नासा (NASA) ने वाय-फाय (wi-fi) ची सेवा सुरू करून दिली आहे. दुसरं काही चालू असो वा नसो, पण आपल्या पिढी चे व्हाट्सअप (whatsapp) आणि फेसबूक (facebook) कधीच ऑफलाइन नाही जाणार. पृथ्वीवरचे आप्पाजी व चंद्रावरचा नातू हे व्हिडिओ कॉल सुद्धा करणार आणि हो मित्रांचे वाढदिवस आता चंद्रावरून online होणार.


पृथ्वीवर ओझोनचा थर असल्याकारणाने Helium(He) बनवण्यासाठी उपयोगात येणारे सूर्यातील किरण, पृथ्वीच्या आत प्रवेश करू शकत नाही. पण चंद्रावरील कोणताही ओझोनचा थर नसल्यामुळे तिथे Helium(He) अति प्रमाणात आढळते. म्हणून आपण चंद्राला 'Helium ची चिडिया' नक्की म्हणू शकतो.तिथे Helium खूप प्रमाणात आढळतो आणि त्या कारणाने Helium(3) ची थोडी मात्रा सुद्धा एका मोठ्या शहराला पूर्ण वर्षभर ऊर्जा देऊ शकते. म्हणून लोकांना तर चंद्रावर रोजच दिवाळी वाटेल!


२१ व्या शतकात परिस्थितीने माणसाला मुखवटा (मास्क) अनिवार्य आहे हे शिकवले. पण चंद्रावर ऑक्सिजन नसल्याकारणाने मुखवटा (मास्क) ची भूमिका 'ऑक्सीजन सिलेंडर' नक्कीच निभावणार.


अशी असेल भारी चंद्रावरची दुनिया !!!!


429 views3 comments

Recent Posts

See All

3 Comments


tejaswiniwadhe689
Nov 21, 2020

Sonu tu khup Chan lihil..🔥🔥💯🤩🤩 #Chandravarchi duniya...Kahi tri navin vatl...

Like

durgekar12
Nov 21, 2020

अजून जे लोक चंद्रावर समोर राहणार, त्यांना नेहमी पृथ्वी दिसत राहणार, आणि जे चंद्रावर मागच्या बाजूने राहणार त्यांना कधीच पृथ्वी दिसणार नाही😂

Like

durgekar12
Nov 21, 2020

पृथ्वी ग्रहण हे नवीनच वाचलं, जसे आता चंद्राच्या कला आहे, तसा पृथ्वीच्या कला पण असेल ना??


Like
Post: Blog2 Post
bottom of page