निसर्गाची किमया
- Shravnee Kulkarni
- Nov 20, 2020
- 3 min read
निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात.अनेक गोष्टींचे आकलन होते.गुलाबाच्या झाडाला काटे का? लाजळूच झाड स्पर्शाला प्रतिसाद का देते?झाडांमध्ये प्राण आहे हे आपण कसे म्हणतो?
१९८० च्या दशकात दक्षिण आफ्रिकेच्या ईशान्य भागात एक न उलगडलेले रहस्य होते.अत्यंत दुष्काळग्रस्त भाग.परिस्थिती बिकट होती.बाभळीचे झाड हे शाकाहारी प्राण्यांसाठी एक आशेचा किरण होते.प्राणी त्या झाडांवर आपली भूक भागवत होते.प्रत्येक जीवासाठी स्वतःच्या सौरक्षणासाठी काही उपाययोजना असते.प्राण्यात बघितले तर वाघाची नखे, सापामधील विष त्याप्रमाणे झाडांचेही असते. कुडो(kudo) हे प्राणी आफ्रिकेमध्ये पर्यटनाचे एक उत्तम साधन होते. परंतु चांगले चालले असताना अचानक माशी शिंकावी तसा ह्या कुडो प्राण्यांचा नाश होऊ लागला. अचानक मरण पावू लागले. हे असे कित्येक महिने चालले होते. प्राध्यापक वूटर होंन ह्या जीव शास्त्रज्ञांनी सर्व निसर्गाचा खेळ बघितला. त्यांनी सांगितले कुदोंची संख्या भागिले त्यांचं आकारमान आणि चापल्य यांचा प्रत्यक्ष संबंध आहे. जितके जास्त कूडो एका गटात तितकी जास्त कुडोंची मृत्यू संख्या. हे अगदी गाईप्रमाणेच अन्न पचवतात. ह्या शास्त्रज्ञांनी कुडो चे शवविच्छेदन (पोस्ट मार्टम)केले. ह्या पहिल्या अहवालात हे कळाले की टॅनिन (biomolecules that bind proteins)चा अती प्रमाणामुळे हा सगळा प्रकार घडला असावा.मग आता हे टॅनिन काय आहे?जसे आपण युद्धात शत्रू ला हरवण्यासाठी शस्त्रांचा वापर करतो तसेच हे बाभुळाच झाड त्याच्या पानांवर अवलंबून असणाऱ्या किड्यांसाठी मारणारे शस्त्र आहे.थोडक्यात लढण्यासाठी ढाल म्हणून हे बाभुळाचे झाड या टॅनिन चा वापर करते पण ह्यांचा एक दोष असा की,या टॅनिन च्या अतिसेवनामुळे अन्न पचविण्याच्या क्रियेत अडथळा निर्माण होत होता आणि म्हणूनच कुडो मध्ये सापडलेल्या या अती प्रमाणातील टॅनिन मुळेच त्यांचा अंत होत होता.परंतु पुढे रसायन शास्त्रज्ञांनी प्लास्टिक पिशव्या नी त्या बाभळीच्या झाडावरील असलेल्या वायूला कैद केले आणि सापडलेला वायू CH2=CH2(Ethylene)जो ह्या प्राण्यांना घातक होता.
मॅडागासकर मधील प्राध्यापक फ्रान्सिस होले म्हणाले झाडांना स्वतः चा असा सुगंध असतो. लाजाळूचे झाड तर आपल्या सर्वांच्याच परिचयाचे आहे.आपल्याला माहिती आहे की लाजाळूच्या झाडाला स्पर्श केला तर ते त्याची पाने बंद करते . टर्गर दाब कमी झाल्यामुळे होते असे आढळले आहे.टर्गर(internal cell pressure) दाब हा कोषिकांच्या(cells) आतील द्रवामुळे व पाण्यामुळे कोषिकांच्या बाह्यावरणावर पडणारा जोर होय. तो जोर या झाडास सरळ उभे राहण्यास मदत करतो. परंतु तो दबाव जर उत्तेजनामुळे(stimulus) बिघडला तर झाडांमधील रसायने आतील पाण्यास, ती कोषिका सोडण्यास बाध्य करतात. हा दबाव कमी झाल्यामुळे झाड गळल्या सारखे होते. त्या झाडाला लाजाळू नाव पडले आहे.पण या मागे शास्त्रीय कारण आहे . लाजाळूच्या पानांवर पाण्याचा दबाव असतो.जेव्हा आपण त्यातील एखाद्या पानाला स्पर्श करतो तेव्हा त्यातील पाण्याचे प्रमाण बदलत,परिणामी पाण्याचा दबाव बदलतो आणि त्याला हे उत्तेजन मिळते. जेव्हा हा पाण्याचा दबाव योग्य असतो तेव्हा त्याची पाने मूळ रूपात असतात.कारण ह्या पाण्याच्या समान दाबामुळे पानाला त्याचा समतोल राखण्यास मदत मिळते.
आपण हे बघितल की झाडाला स्पर्श कळतो तर झाडांवर आवाजामुळे काही परिणाम होतो का?तर उत्तर होय असे आहे.नर्तक हे असे झाड आहे की त्याला स्पर्श केल्यावर काहीच कळत नाही पण जर एक सुमधुर गीत लावले तर ते ठरल्या प्रमाणे नाच करते.प्राध्यापक रॉजर ने तर ह्या झाडांसाठी विशेष गीतं देखील तयार केली आहेत. हल्लीच्या काळातील गोंगाट करणारी कर्कश गाणी त्यांच्यावर काही परिणाम करत नाही.
थोडक्यात काय तर झाडांचा रंग,गंध,आवाज,चव,स्पर्श हे सर्व माणूस आपल्या पंचेंद्रियांनी समजून घेऊ शकतो कारण माणूस हा बुध्दीजीवी प्राणी आहे. पण झाडांबाबत देखील काही गोष्टी अशा आहेत की त्या तर्काने आपण जाणून घेऊ शकतो.
झाडांना बुध्दी असते का?माणसाची बुध्दी ही त्याने बिकट परिस्थितीत दाखवलेली जिद्द आणि घेतलेले योग्य परिश्रम यावर ठरते.
झाडांना स्मरणशक्ती असते का!स्मरणशक्ती म्हणजे एखादा संदेश साठवण्याची व योग्य वेळी तो आठवण्याची ताकद होय. डार्विनने सांगितले की झाडांचे मूळ हे मेंदू प्रमाणे काम करत असते .हा विषय अत्यंत नवीन आणि उत्सुकता वेधक आहे.
झाडे निद्रा घेतात का?जपानच्या लोकांनी यावर खूप संशोधन केले.झाडामध्ये असलेले पोटॅशियम हे रसायन झाडाला झोपण्याची ठराविक वेळ सांगते, त्याला प्रवृत्त करते. जर झाडांना झोप मिळाली नाही तर झाडे मरण पावतात.
वरील सर्व माहिती वरुन एक लक्षात येते की या निसर्गामध्ये प्रत्येक सजीव स्वतः चे अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतः च स्वतः चे रक्षण करत असते.
Comentarios