सुश्रुताने वैद्यकीय उपचार पद्धतीत व्रण शिवण्यासाठी कीटकांचा उपयोग केल्याचा उल्लेख आहे. डोंगळ्याच्या जबड्याची दोन टोके व्रणाच्या दोन्ही कडा एकत्र आणून त्यावर ठेवायची.डोंगळ्याने चावा घेतला,की डोके धडापासून वेगळे करावयाचे. मृत झाल्यावर शरीराला कडकपणा ( रायगर मोर्टिस) होतो. तो तेवढा काळ जखम भरण्यास पुरेसा असे. त्यानंतरचा उल्लेख इजिप्तमधील इसपू .१५०० वर्षामागचा.' बिग स्क्रब ' या कीटकाचे डोके व पंख तोडायचे, शरीर पाण्यात उकळवून जे मिश्रण तयार होईल, त्याचा पोटासारखा दुसऱ्या भागावर लेप करावयाचा. तोडलेल्या अवयवांचे सूप करून पिण्यास देत असत. ग्रीसमध्ये गादी ओली करणाऱ्या लहान मुलांच्या मूत्रमार्गात ढेकूण चेचून त्याचा गोळा ठेवत असत. तांबड्या मुंग्यांच्या शरीरात फॉर्मिक अॅसिड असते. थायलंडमध्ये मुंग्यांचे वाटण जखमांचे निर्जंतुकीकरण करण्यास वापरत असत. तर बाराव्या शतकात जर्मनीमध्ये थकवा न येणे किंवा आलेला थकवा घालवणे यासाठी चक्क जिवंत मुंग्यांचे इंजेक्शन देत असत.
आपण कीटक कितीही किळसवाणे समजत असलो, तरीही माणूस व इतर सर्व सजीव किटकांपासून प्रथिने मिळवतो. त्यासाठी चक्क कीटकांची पैदास सुद्धा व्यापारी पद्धतीवर केली जाते. चीनमधील डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन मध्ये वेगवेगळ्या रोगांवर उपयोगी असलेल्या कीटकांची नावे व प्रमाण नोंदविलेले असते. सुमारे १,७०० प्रकारचे कीटक औषध म्हणून वापरले जातात. कांजण्या आल्यास प्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी चीनमध्ये जनावरांच्या अंगावरच्या पिसवांचा चावे करून घेत असत.
जळवांचा वापर तर जगभर होत आहे,वाढत आहे. माझ्या लहानपणीच्या आठवणीत शनिवारवाड्याच्या बाजूला, भडक्यात जळवा घेऊन वैदू बसलेले पाहिल्याचे स्मरणात आहे. रक्त साकळणे, गळवे,सूज, जेथे अशुद्ध रक्त वाहिन्यात अडथळा आहे,अशा जागेवर जळवा लावतात. प्लास्टिक सर्जरीमध्येही वापरल्या जातात.जुन्या न भरणाऱ्या जखमा,'व्हेरिकोज अल्सर' वर वापरतात.जी जखम बरी होत नाही, तिच्या आसपास नवीन जखमा तयार करावयाच्या , त्यांच्याबरोबर जुन्या जखमाही भरून येतील. जखमेवर जळू लागल्यावर तिच्या लाळेत हीपॅरीन हे रसायन असते, जे रक्ताची गुठळी होण्यास प्रतिबंध करते. हृदविकारावरही हीपॅरीन वापरतात.ज्या वेळी रक्त गोठू नये, अशी परिस्थिती चिकित्सेत येते,तेथेही बरेच वेळा जखमेत अळ्या झालेल्या आपण पाहिले व ऐकले असेल. माशांना अंडी घालण्यास उघड्या, सडणारी जखमही योग्य जागा असते. या अळ्या फक्त मृतपेशी खातात.एकप्रकारे कुशल शस्त्रक्रिया करतात. याचा वापर वैद्यकीय उपचारात करून घेतला आहे .ज्या जागी प्रतिजैविके पोहचत नाहीत, शस्त्रक्रियेची हत्यारे पोहचत नाहीत,अशा जागी जाऊन सफाईचे काम या अळ्या करतात. संशोधनाने असे समोर आले आहे, की त्यांची विष्ठा जीवजंतू वाढण्यास अडथळा आणते, नष्ट करते. नेपोलियनच्या ज्या जखमी सैनिकांच्या जखमांमध्ये या अळ्या झाल्या,त्यांच्या जखमा लवकर बऱ्या झाल्या,त्यांच्यात मृत्यू दर कमी होता. पहिल्या महायुद्धात अमेरिकी डॉक्टर विल्यम बेर याने ही उपचार पद्धती वापरली होती.फ्रान्स मध्ये सुद्धा जखमा भोवतालचा रक्तप्रवाह सुधारावा, यासाठी कळवा मॅगोटस अशी संयुक्त उपचार पद्धती वापरली जाते. साधारणतः एक चौरस इंच जखमेसाठी २० मॅगटस असा हिशोब केला जातो.
मध, मधमाशा, मेण या सर्व गोष्टींचा वापर चिकित्सेत केला जातो. मेण सुजेवर, मलमे बनवण्यास, त्वचा मृदू करण्यास वापरता येते. मध जखमांवर लावण्यासाठी , मधामधे ब्यांडेजेस भिजवून ड्रेसिंग साठी वापरली जातात.मध जंतू वाढीस अटकाव करतो, जखमेतील अतिरिक्त पाणी, स्त्राव शोषून घेतो. मॉइश्चरायझर काही काम करतो. इजिप्तमध्ये ममीबरोबर मध ठेवला होता, तो ३००० वर्षानंतरही खाण्यायोग्य होता. संधीवात असल्यास मधमाशा, गांधीलमाशा यांचे डंख जांघेवर मारून घेतले जातात. कोरिया अॅक्यू पिक्चरच्या सुयांच्या टोकांना, डंखातील मिलीटीन हे प्रथिन लावले जाते. या डंखानंतर
त्या जागी सूज येते. रक्तप्रवाह सुधारतो, प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. हेच प्रथिन एड्सवर सुध्दा प्रभावी आहे. या डंखांवर ब्राझीलमधील साओ पावलो विद्यापीठात संशोधन चालू आहे. सामान्य मधमाशी राणीमाशीत रूपांतर करणारी 'राॅयल जेली', ही तारुण्य टिकवण्यासाठी सेवन केली जाते.
मधमाश्यांच्या डंखातून जे स्त्राव निघतात, त्यातून ४६ प्रकारची रसायने वेगळी करण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे.
हमानो पेट्रोल या किटकाचे विष नसांचा ऱ्हास होऊ नये, नुकसान होऊ नये म्हणून वापरले जाते. कॅथेरिडीन हे रसायन एका खवल्या कीटकाच्या प्रजातीत सापडते. त्यात मूत्राशय, आतडे व तोंडातील कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबवण्याची ताकद आहे. जे विंचवाचे विष दरवर्षी हजारो मृत्यूचे कारण ठरते, ते रक्तातून मेंदूच्या भोवतालच्या स्त्रोत जाऊ शकते व कर्करोगग्रस्त भागाकडे जास्त आकर्षित होते. त्याच्यात 'चमकणारे' फ्लरोसेंट द्रव मिसळण्यात यश आले आहे. हे तपासणी करण्यात हे एमआरआयपेक्षा जास्त प्रभावी ठरते. शस्त्रक्रिया करताना मार्गदर्शक ठरते. एक प्रकारे 'सर्जिकल रोडमॅपच!' अमेरिकेतील सिअॅटल येथे २०१३ मध्ये झालेल्या वैद्यकीय परिषदेत जिम अॅसलाॅन या सर्जन संशोधकाने या प्रकारे एका कुत्र्यावर शस्त्रक्रिया करून दाखवली. २०१३ पासून ऑस्ट्रेलियात व २०१४ पासून अमेरिकेत याचे माणसावर प्रयोग सुरू
झाले आहेत. एकाच प्रजातीच्या गोगळगाई झिंको ताईट हे रसायन असते. हे मोर्फिन ऐवजी वापरता येते;पण त्यात एक वैगुण्य आहे. ते रक्तातून मेंदूच्या स्त्रावात प्रवास करू शकत नाही, तर लंबर पंक्चर वाटे टोचावे लागते.
ताम्र भस्म बनवण्यासाठी लागणारे माध्यम म्हणजे गांडूळ. त्यांची स्वतःची प्रतिकारशक्ती फारसी विकसित झालेली नसते; पण सर्व जीवजंतूचा सक्षमपणे सामना करू शकतात. त्यांच्या शरीरात प्रतिजैविकाचे व कर्करोग निरोधन करणारी रसायने सापडतात; त्यावर संशोधन चालू आहे.नॉटिंगहॅम येथील शास्त्रज्ञांनी झुरळाच्या मेंदुपासून प्रभावी प्रतीजैविक रसायन वेगळे केले आहे.ते 'सुपरबग्जवर ' सुद्धा प्रभावी आहे. ज्या वातावरणात गांडूळ , झुरळ वाढतात, तेथे सर्व प्रकारच्या जंतूंचे साम्राज्य असूनसुद्धा तग धरतो. हाच धागा संशोधनास प्रवृत्त करणारा ठरला. असे संशोधन इतर अनेक किटकांवर जगभर चालू आहे. कीटक आणि किळस हे एक समीकरणच आहे; पण जर कीटकांचा नायनाट झाला, तर पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टी ऱ्हास होईल. अशा किटकांपासून बनवण्यात येणाऱ्या औषधांची २३,००० हून जास्त पेटंट मिळाली आहेत व मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
Comments