जीवसृष्टीच अस्तित्वच जन्म-मृत्यू चक्रावर अवलंबून आहे, यासाठी संरक्षण, उदरभरण आणि वंशवृद्धी या महत्त्वाच्या बाबी. नवीन उत्पत्ती अनेक मार्गांनी होत असते, जीवाणूंचे विभाजन, वनस्पतींना येणारे फुटवे, प्राणी-पक्षी जगतात नर-मादीचे मिलन, तेही योग्य काळात होणे महत्त्वाचे असते. याला ज्ञात असलेला अपवाद एकच, झुरळे. जर नरांची कमतरता असल्याने समागम शक्य नसेल अशा अपवादात्मक परिस्थितीत झुरळाची मादी पुनर्निर्माण करू शकते, पण होणारी सर्व आपत्य स्त्रीलिंगी असतात. बरेच वेळा दुर्मिळ प्रजातीत नर मिळणे आणि मिळाला तर परत परत मिळते कठीण. मग हे चक्र कसे चालू राहू शकणार? अँगलर फिश - माशांची एक प्रजाती, समुद्रात एक हजार फूट खोलीवर हे मासे सापडतात जेथे प्रकाश पोचत नाही. अफाट विशाल समुद्र त्यात ही एक मर्यादित प्रजाती, अशा परिस्थितीत नरमादी भेट दुर्मिळ, प्रजाती तर टिकून राहते मग हे सर्व कसे घडत असेल?
जेव्हा माशांच्या नर-मादी मिलनाकरता एकत्र येतात, बरेच वेळा मिलनानंतर नर हा मादीच्या शरीराशी कायमस्वरूपी एकरूप होऊन जातो, येवढेच नाही की त्यांचे अन्नमार्ग श्वसनमार्ग सुद्धा एकमेकांत मिसळून जातात, एक बनतात. काहीवेळा एकापेक्षा जास्त नर मादीच्या शरीरात कायमस्वरूपी एकरुप होऊन जातात याला "सेक्शुअल पॅरासायटीझम" म्हणतात. ज्याप्रमाणे आपल्या शरीरात इतर उपरे जीव येऊन राहतात उदाहरण म्हणजे मलेरियाचे जंतू, पोटात होणारे जन्त. पण या माशाचा बाबतीत नर मादी यांची एकरूपता पूर्ण उरलेल्या जन्मकरिता असते! काही वेळा हे नर-मादी मिलनानंतर विभक्तही होतात. या माशाच्या प्रजातीच्या ३०० पेक्षा जास्त पोटजाती आहेत, दुर्मिळ आहेत. एक हजार फुटापेक्षा जास्त खोलीवर, विरळ असल्यामुळे शास्त्रज्ञांना अभ्यास करताना हे जिवंत मासे मिळेनात, पण त्यांच्या शरीराचा पुरेसा भाग जनुकीय अभ्यासाकरिता मिळवू शकले, काही संग्रहालयांमध्ये रसायन ठेवलेले काही मासे मिळू शकले.
ह्या माहितीचा उपयोग काय? त्यावरून संशोधन करण्यात येणार प्रचंड खर्च, वेळ, मनुष्यबळ हे कशासाठी "वाया" घालवायचा हा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे. आपण केलेली प्रत्येक कृती, संशोधन हे मानवाला केंद्रबिंदू ठेवून केले जाते. ह्यात ही स्वार्थ आहे,काय ते शेवटी कळेल. हा स्वार्थ साधण्यासाठी अनेक वाटांनी जावे लागते, सर्व जरी पूर्णत्वाकडे नेणाऱ्या नसल्या तरीही! किंबहुना बंद वाटा कळणेच गरजेचे असते.
हा उहापोह करण्याचे कारण म्हणजे एक तर हा सगळाच वेगळा प्रकार. दुसरे म्हणजे आपल्या शरीरावर कोणत्याही जिवाणू वा किटाणूंनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तरी वेगवेगळ्या संरक्षण यंत्रणा वापरून आघात थोपवण्याचा प्रयत्न केला जातो. रक्तदाता व रक्त घेणारा दोघांचे रक्त एकमेकांना पूरक असणे गरजेचे असते, अगदी एका वंशाचे, प्रजातीचे जरी जीव असतील तरी अवयव प्रत्यापरोपण होईल याची खात्री नसते. येवढेच काय एखाद्या माणसाच्या शरीरातून एक सीसी रक्त काढून त्याच्याच दंडात टोचले तरी शरीर निषेध नोंदवते, रिअॅक्शनच्या स्वरूपात.
आपल्यावर हल्ला झाला तर अनेक प्रतिकार यंत्रणा असतात- मुख्य म्हणजे आपली त्वचा. हवा गाळण्यास नाकात केस असतात, लाळ, नाकाचे स्त्रावसुद्धा अटकाव करण्याचा प्रयत्न करत असतात.शरीरात जर जन्तूचा प्रवेश झाला तर मॅक्रोफाज पेशींची फौज ते गट्टम करण्याचा प्रयत्न करते. विशिष्ट रोगांचे व्हायरस वा बॅक्टेरिया यांचा प्रतिकार करण्यासाठी अॅंटिबॉडी तयार होतात, त्यात थोडा वेळ जातो, तोवर टी सेल्स या सैनिक पेशी हल्ला करून रोग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असतात. अशा वेगवेगळ्या रचना प्रत्येक सजीवात असतात. अगदी बॅक्टेरियासुद्धा प्रतिकूल परिस्थितीत "कोषात" जाऊन अनेक वर्ष जिवंत राहू शकतात. मग या माशांच्या बाबतीत ही वेगळीच गोष्ट का ? निसर्गाने दिलेले संरक्षणाचे कवच नाही का?
जर्मनीमध्ये मॅक्स प्लॅंक इन्स्टिट्यूट येथील प्राध्यापक इम्युनोलॉजी व एपिजेनेसिसचे थॉमस बोहेम आणि वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक टेड प्लेश हे गेल्या सहा वर्षांपासून या माशांच्या जनुकीय रचना व त्यातील प्रजोत्पादनासाठी होणारे बदल या विषयांवर आपल्या सहकार्यांसोबत अभ्यास करत आहेत.
त्याचे आतापर्यंतचे निष्कर्ष असे दर्शवतात की या माशांमध्ये नर-मादी ठराविक परिस्थितीत ठराविक परिसरातच मिळणे दुर्लभ आहे आणि सातत्याने प्रजोत्पादनासाठी हा एकच मार्ग निसर्गापुढे उपलब्ध आहे व नैसर्गिक प्रतिकार यंत्रणा इम्युन रिस्पॉन्स या क्रियेपुरता नियंत्रित केला आहे.
अर्थात ह्या संशोधनाचा उपयोग मानवाने वेगवेगळ्या स्वरूपात करता येईल का याचा विचार करत आहे. प्रत्यारोपण केलेले अवयव शरीराने स्वीकारावेत यासाठी शरीराची नैसर्गिक प्रतिकार यंत्रणा निष्प्रभ करणे गरजेचे असते. अनेक औषधे दीर्घकाळ वापरावी लागतात. या माशांनी ही किमया साधली आहे हे कोडे सोडवणे व त्याचा आपल्यात वापर करता येणे शक्य आहे का याची चाचणी करणे. यामुळे प्रत्यारोपण केलेले अवयव शरीर नाकारते त्याला आळा घालण्यासाठी वेगळी उपचार पद्धती मिळू शकेल.
Comentarios