top of page

कशासाठी?!...पोटासाठी

Dr. Prakash Joglekar

‌आपली पुढची पिढी नुसती जन्माला घालून भागते अशा प्रजाती फार थोडया- उदाहरणच द्यायचे झाले तर सरडे- साप यांसारखे सरपटणारे प्राणी, कीटक, मासे, खेकडे, कासव यांसारखे जलचर- कोकिळे सारखा एखादा पक्षी. ज्या प्रजातींमुळे आपल्या पुढच्या पिढीची बरेच दिवस ,महिने काळजी घ्यावी लागते तेथे समुहजीवन किंवा कुटुंबसंस्था अस्तित्वात आली. निसर्ग सुद्धा काही काळज्या घेतो. साधे उदाहरण-पक्षांची पिल्ले मोठी होईपर्यंत आईबापापेक्षा वेगळी दिसतात. नाहीतर बालवयात पकडणे सोपे म्हणून पकडली गेली असती.


जन्माला आल्यावर सर्वात महत्वाचे ते उदरभरण. गाय, हरीण यांची पिल्ले जन्माला आली की काही मिनिटात आपल्या पायावर उभी रहातात, एकीकडे आई बाळाचे अंग चाटून साफ करत असते तर बाळ स्तनपानास सुरुवात करतात. सुसरीसारख्या जलचरांची पिल्ले आपली आपण खाद्य मिळवायला लागतात, पण आई त्यांच्या संरक्षणाची पूर्ण काळजी घेते. सापाची पिल्ले जन्मानंतर २ ते ३ आठवडे काहीच खात नाहीत, त्यांचे विष हे प्रथिनांपासून बनलेले असते. थोडक्यात ते विष जास्त जहाल असत, त्यावर त्यांची सुरुवातीची वाढ होते. अॅटलास माॅथ ही पाकोळी जन्मानंतर काहीच अन्नग्रहण करत नाही. कोषात जाण्यापूर्वी "अळी" अवस्थेत जे अन्न खाल्लेले असते ते पुढच्या अवस्थेत पुरते. आयुष्य ८ ते १० दिवसांचे, त्यात प्रजोत्पादन करणे एवढे एकच काम. काही सजीवांची मात्र गोष्टच वेगळी. काही मुंग्या झाडाच्या पानांचे तुकडे आपल्या वारुळात खोलवर नेऊन ठेवतात जी जागा उबदार असते व योग्य आर्द्रतापण असते. त्या पानांवर एक प्रकारची बुरशी वाढते, जी खाऊन पुढची प्रजा प्रौढावस्था प्राप्त करते.


पक्ष्यांची पिल्ले अंड्यातून बाहेर पडल्यापासून ते प्रौढावस्था हा काळ फार थोडा असतो, वाढ झपाट्याने होते. भूकही अफाट! आई बापांच्या खाद्य घेऊन सारख्या फेऱ्या चालू असतात तरी पिल्लांच्या चोची कायमच वासलेल्या असतात. खाटीक, shrike हा शिकारी पक्षी, पाली, सरडे, बेडूक, उंदीर ह्या सारखे खाद्य. यापैकी एखादा प्राणी पकडून मारावयाचा आणि घरट्या जवळच काटेरी तार बाभळीसारखा काटा बघून त्यावर टोचून ठेवायचा - आपण नाही का खाटकाच्या दुकानात बकरं टांगून ठेवलेलं बघतो!


दक्षिण अमेरिकेत शहामृग प्रजातीतील सर्वात लहान पक्षी , एमू सारखा दिसणारा - लहान ऱ्हिहा पक्षी - lessar rhea - मादी काही दिवस ओळीने अंडी घालते - साधारणपणे ती एकत्रितच उबवली जातात, ज्यायोगे थोड्या फरकाने पिल्ले जन्माला येतील तर एक घरटे तयार करून त्यात अंड्यांची उबवण्याचा दृष्टीने योग्य मांडणी करतो, पण हेतूपुरस्पर 2 - 3 अंडी घरट्या बाहेर ठेवतो - उद्देश काय असेल असे वाटते? पिल्ले बाहेर येईपर्यंत ती अंडी कुजून त्या खाद्यासाठी कीटक येतात येतात - जी नवीनच जन्म घेतलेल्या पिल्लांचे उदरभरण करतात.

कुंभरमाशीची तऱ्हाच वेगळी - हे आमच्याघरी एका वेलीवर घडलेल मी पाहिले आहे. मातीचे घर, चाळच ती भिंतीच्या वा एखाद्या फांदीच्या आधारे बांधते, ज्यात अनेक कप्पे असतात. बाहेरून एकादी अळी मारून आणायची, एका कप्याने ठेवून त्यावर अंडे घालावयाचे व घर मातीने लिंपून बंद करायचे, अंड्यातून अळी बाहेर येऊन कोषात जाईपर्यंत तिला हे खाद्य पुरते. कोषातून माशी बाहेर पडून घर उघडते, उडून जाते!

उदरभरणाचा एक भाग आपण पाहिला. थोडा दुसरा भाग पालकत्व. हे अंडे वा मूल आईच्या उदरात असल्यापासून सुरू होते ते मुलाचे परावलंबित्व संपेपर्यंत. हा काळ वेगवेगळा असतो. शिकारी प्राणी पक्षांमध्ये जास्त , कारण खाद्य मिळवण्यास लागणारी ताकद, खुब्या या शिकण्यास लागणारा जास्तीचा वेळ. मनुष्य प्राण्यात तर सर्वात जास्त. आपल्या पाल्याच्या उदरभरणासाठी पालकांना काय काय खेळ करावे लागतात?


ओरांग ओटांग माकडात हा काळ ८ वर्षांचा असतो.६ व्या महिन्यापासून पाल्याचे प्रशिक्षण सुरू होते. झाडाच्या शेंड्यावर रोज स्वतःचा बिछाना तयार करावयास जमले पाहिजे. खाद्य उपलब्ध असले तरी तोवर माता स्तनपान करते. त्यात तिची आबाळ होतेच.


पेंग्विन पक्षी प्रजोत्पादनासाठी ५००० कि. मी. प्रवास करून येतात, दमछाक झालेली असतेच. घरटे बांधण्यास लागणारा वेळ वेगळा, मादीने अंड घातल्यावर नर त्याच्या दोन पायांचा पाळणा करून अंड उबवतो, हा काळ दोन महिन्यांचा असतो, त्या काळात तो काहीच खात नाही.

ल्फिबोनोेटस पोटजातीतील पाणथळ प्रदेशातील झुरळाची मादी तिची पिल्ले पंखाखाली वाढवते. ती मोठी होईपर्यंत आपल्या आईच्या रक्तावरच वाढतात.


दोडेलिअर्स कार्डिनल फिश - मादीने अंडी घातल्यावर आपल्या पिल्ल बाहेर येईपर्यंत ती नर तोंडात सांभाळतो - हा काळ पूर्ण उपासाचा. सगळ्यात त्याग हा Giant Pacific Octopus ची मादी करत असते. एकावेळी - किंबहुना एकदाच जवळजवळ एक लाख अंडी घालते, ती सर्व द्राक्षाच्या घडांसारखी तिच्या अंगाला चिकटून असतात, ६ महिन्यांच्या उबवणीचा काळ. हा सर्व काळ अंड्यांना प्राणवायू पुरवठा नीट होतो हे बघणे स्वच्छता करणे ह्यात जातो - या वेळेत ती काहीच खातपीत नाही - पिल्ले बाहेर आल्यावर ती मृत होते. कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्या जवळ एक मादी हे काम ४ वर्षे ५ महिने करत असल्याचे शास्त्रज्ञांचा निदर्शनास आले होते. ही निरीक्षणे त्यांनी पाणबुडीतून केली.


12 views0 comments

Recent Posts

See All

Comments


Post: Blog2 Post
bottom of page