top of page

नवीन धोका

  • Dr. Prakash Joglekar
  • Nov 20, 2020
  • 2 min read

प्रत्येक नैसर्गिक जलस्त्रोत, नदी ,नाल्यांमधील पाणी मूलतः स्वच्छ असते. पाणी हे निसर्गातील सर्व सजीवांना जीवन म्हणूनच माहित असते व ते स्वच्छ ठेवण्याची काळजी मानव सोडून सर्वच घटक घेत असतात. आपण मानवच अनेक वर्षे प्रक्रिया न केलेले मैलापाणी नदीत सोडत आहोत. औद्योगिक वापरासाठी निरुपयोगी झालेले रसायने, साखर कारखान्यातील मळी स्वच्छ पाण्यात सोडत आहोत. भूगर्भात ३००-४०० फूट कूपनलिका खोदून त्यात विषसदृश रसायन भुगरबातील सोडत आहोत.

असंख्य मासे मरतात . प्रदूषण प्रबंधक संस्था, न्यायालयांनी या प्रकारांवर ताशेरे विसरून घरचे निर्माल्य, प्लास्टिकच्या पिशवीत भरून , नदीकडे पावले वलवतो. नदी नाले प्रदूषित करणारे करतच राहतात कारण कारखाने बंद केले, तर किती लोकांच्या पोटावर पाय येईल येव्हडाच विचार होतो; पण त्या स्त्रोतावरी अवलंबून असलेल्या सगळ्याच सजीवांचे आरोग्य बाधित होत असते हे आपण विसरतो.

नदी शुद्धीकरण मोहिमेने काहीही साध्य होणे शक्य नसते. निवडणुकीला उभा राहिलेला कोणताही उमेदवार जलस्त्रोत स्वच्छ ठेवण्याचे आश्वासन देत नाही. उलट ' ओढे - नाले बिनधास्त बुजवा, नदीपात्र व्यापा , मी तुमच्या पाठीशी आहे,' अशी जणू हमीच देत असतो. पुढील युद्ध पाण्यावरूनच होणार हे भाकीत फार पूर्वी केले गेले आहे.पाण्याचा गैरवापर टळत नाही. हा सर्वांचा अनुभव आपण सध्या घेत आहोत. या संबंधीचे घेतले जातात,ते मतपेटीकडे बघून!

अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठाच्या मुखपत्रात एक घटना नमूद करण्यात आली आहे. अमेरिकेतील टोलॅडो शहरवासीयांना ' लेक एरी' मधून दूषित पाणीपुरवठा केला जातो.हा पाणीपुरवठा दोन वर्षांपासून अती दूषित बनला होता. या पाण्यावर चार लाख माणसे व इतर जीव अवलंबून आहेत.या तलावाचा पाणीपुरवठा लेक मिशिगन मधून होतो आणि जी महाकाय पाच तळी आहेत त्यात जगातील २२ टक्के गोड्या पाण्याचा साठा आहे.ती एकमेकांना नैसर्गिकरित्या जोडली गेलेली आहेत. त्यामुळे या तळातील पाणीही दूषित होण्याचा संभव होता. या धोक्यावर मिशिगन विद्यापीठातील ११ शास्त्रज्ञ व त्यांच्या विद्यार्थ्यांनी संशोधन सुरू केले. मॉमी नदी लेक एरीला येऊन मिळते.त्या नदीच्या खोऱ्यात बरीच शेती केली जाते. जास्त उत्पादन मिळावे यासाठी शेतकरी फॉस्फरसयुक्त खते मोठ्या प्रमाणात वापरत होते.त्यातील बराच अंश जमिनीत मुरून नदीच्या पाण्यात जात होता.ते पाणी लेक एरीमध्ये विषारी अल्गी वाढण्यास कारणीभूत ठरले. हे शास्त्रज्ञ ही माहिती घेऊन शेतकऱ्यांकडे गेले.सर्वांनी ही खते न वापरण्याचे आश्वासन दिले. आता काही ठिकाणची लागवड बंद करण्यास सांगितले आहे.

आपल्याकडे उसा सारख्या पिकास भरपूर खतांची मात्रा दिली जाते; तसेच पाणी कीटकनाशके इतर घातक रसायने असतातच!

जलाशयाचे शुद्धीकरण करताना काही काळजी घेणे आवश्यक आहे.आपण सहज म्हणून काही घातक पदार्थ टाकतो. एवढ्याने काय होते असा विचार करतो; पण एकट्या गोष्टीचे कसे दूरगामी परिणाम होत असतात हे आपल्या लक्षात येत नाही.


Comments


Post: Blog2 Post
bottom of page